Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra : महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलत 28 जून 2024 रोजी “माझी लाडकी बहिण योजना” सुरू करण्याला मंजुरी दिली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य सुनिश्चित करणे त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे आणि कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका अधिक बळकट करणे हे आहे. “माझी लाड़की बहिण योजना (Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra)“, ही योजना सध्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ़ या दोन्ही राज्यांमध्ये सुरु आहे.
तसेच आता महाराष्ट्र सरकारनेही महिला सक्षमीकरणासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. या योजने अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्टया कमजोर, निराधार, विधवा महिलांना प्राधान्य दिले जाईल आणि त्यांना दरमाह 1500 रुपयांची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या सामाजिक स्थिति सुधारणे हा आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना काय आहे.? (What is CM Ladki Bahin Yojana 2024)
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे माझी लाडकी बहीण योजना – Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra. या योजनेतून महाराष्ट्रातील पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपये आणि दरवर्षी तीन मोफत LPG सिलेंडर मिळणार आहेत. या योजनेचा फायदा राज्यातील अंदाजे 1.5 कोटी महिलांना होईल. सरकार दरमहा हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करेल यामुळे राज्यातील सर्व महिलांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल. ही योजना मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजना वर आधारित आहे.
ही योजना 21 ते 65 वर्षांच्या महिलांसाठी आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो या योजनेची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा पूर्ण लेख वाचा.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे मुख्य उद्देश (Main Purpose of Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana 2024)
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे मुख्य उद्देश –
महिलांना आर्थिक सहाय्य – या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा निश्चित रक्कम दिली जाते.
समाजात महिलांचे स्थान उंचावणे – आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने महिलांना समाजात अधिक आत्मविश्वासाने काम करण्यास प्रोत्साहन मिळते.
कन्या शिक्षणाला प्रोत्साहन – या योजनेमुळे कन्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारणे – महिलांच्या हातात पैसा आल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी लागणारी पात्रता (Elegibility for Chief Minister Ladki Bahin Yojana 2024)
कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो..?
पात्रता निकष – या योजनेची पात्रता निश्चित करण्यासाठी काही निकष ठरवलेले असतात, यात वय, कुटुंबाची आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादी घटक समाविष्ट असू शकतात. अधिक माहितीसाठी या योजनेची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण विभाग किंवा संबंधित सरकारी कार्यालयात संपर्क साधावा
1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची स्थायी निवासी असणे आवश्यक आहे.
2) लाभार्थी महिलेची वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
3) विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत तिलाकट किंवा विधवा महिला पात्र आहेत.
4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
5) लाभार्थी महिलेच्या बँक खात्याची आवश्यकता आहे.
माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र साठी अपात्रता (Not Eligible for Majhi Ladki Bahin Yojana)
1) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 (अडीच लाख) रुपयांपेक्षा अधिक आहे.
2) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत.
3) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रुपये २.५ (अडीच) लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
4) सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये 1500/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन /उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष/ संचालक/ सदस्य आहेत.
7) ज्यांच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Necessary Documents for Chief Minister Ladki Bahin Yojana 2024)
1) आधार कार्ड
2) राशन कार्ड
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) बँक खाते पासबुक (खाते आधार लिंक असावे.)
5) रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
6) वोटर आय डी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमुख लाभ (Major Benefits of Chief Minister Ladki Bahin Yojana 2024)
आर्थिक सहाय्य – या योजने अंतर्गत पात्र महिलांना निश्चित रक्कम बँक खात्यात जमा केली जाते. ही रक्कम महिलांना शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय खर्च किंवा इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडते.
समाजात महिलांचे स्थान उंचावणे – ही योजना महिलांना समाजात समान हक्क आणि जबाबदारी असल्याची जाणीव करून देते.
लोककल्याण – महिलांच्या सक्षमीकरणामुळे कुटुंब आणि समाजाचे आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावते.
शिक्षणाला प्रोत्साहन – या योजनेमुळे महिला शिक्षणाला प्राधान्य देण्यास प्रेरित होतात.
माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी आवेदन प्रक्रिया (Application Process for Chief Minister Ladki Bahin Yojana 2024)
आवेदन ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येईल.
अधिकृत वेबसाईट किंवा नजीकच्या सरकारी कार्यालयातून आवेदन फॉर्म मिळवा.
आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण केलेले फॉर्म जमा करा.
सहाय्यक संस्था – काही गैरसरकारी संस्था महिलांना या सारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करतात. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
ऑनलाइन अर्ज – अनेक योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असते. तुम्ही सम्बंधित वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra : Narishakti Doot App
माझी लाडकी बहीण योजना : परराज्यातून लग्न करून महाराष्ट्रात आलेल्या महिलांसाठी आवश्यक कागदपत्रे
परराज्यातून लग्न करून महाराष्ट्रात आलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट कागदपत्रे आवश्यक असतात. ही कागदपत्रे योजनेच्या पात्रतेची पुष्टी करण्यासाठी आणि लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाची आहेत. रेशन कार्ड वर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतिचे रेशन कार्ड हे उत्पनाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
सामान्यतः आवश्यक असणारी कागदपत्रे
1) ओळखीचा पुरावा – आधार कार्ड, मतदाता ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र
2) राहणीमानाचा पुरावा – महाराष्ट्रातील राहण्याचा पुरावा म्हणून घर भाडे करार, बिजली बिल, पाणी बिल इत्यादींपैकी कोणतेही एक दस्तऐवज
3) लग्नाचे प्रमाणपत्र – लग्नाचे नोंदणीकृत प्रमाणपत्र.
4) कुटुंबाची आर्थिक स्थिती दर्शविणारे दस्तऐवज – आयकर रिटर्न, बँक स्टेटमेंट, जमीन/मालमत्ता दाखले इत्यादींपैकी कोणतेही एक दस्तावेज.
5) रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र.
6) जन्म प्रमाणपत्र तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र.
7) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र – तुमचे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र.
8) विधवा किंवा घटस्फोटीत असल्याचे प्रमाणपत्र – जर तुम्ही विधवा किंवा घटस्फोटीत असाल तर त्याचे संबंधित प्रमाणपत्र
9) मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक – लाभ मिळालेल्या रकमेची जमाखर्च करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.
10) काही अतिरिक्त कागदपत्रे – परराज्यातील राहण्याचा पुरावा – जर तुम्ही नुकतेच महाराष्ट्रात आले असाल तर तुमच्या मूळ राज्यातील राहण्याचा पुरावाही मागवला जाऊ शकतो.
11) पतीचे ओळखपत्र – तुमच्या पतीचे ओळखपत्र
12) कुटुंबातील इतर सदस्यांची ओळखपत्रे – जर तुम्ही कुटुंबांसह राहत असाल तर तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांची ओळखपत्रे ही मागविली जाऊ शकतात.
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी महत्त्वाच्या सूचना ( Important Instructions for Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra )
महत्त्वाची सूचना
नवीनतम अपडेट्स – या योजनेच्या पात्रता निकष आणि लाभांमध्ये कालांतराने बदल होऊ शकतात. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी संबंधित सरकारी वेबसाईट किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा.
स्थानिक कार्यालायाचा संपर्क – या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण विभाग किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन सविस्तर माहिती घ्यावी.
फसवणुकी पासून सावध रहा – या योजनेच्या नावाखाली होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहा. या योजनेची अंतिम तारीख आणि इतर तपशील जाहीर करण्यात आले नाहीत.
सहाय्य – जर तुम्हाला या कागदपत्रांच्या संदर्भात कोणतीही अड़चण येत असेल तर तुम्ही सम्बंधित सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकता.
नारी शक्ति दूत ऍप – या योजनेची माहिती आणि अर्ज प्रक्रिया या App द्वारे उपलब्ध आहे.
हेल्पलाइन नंबर – कोणतीही शंका असल्यास, हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा.
अधिकृत वेबसाईट आणि सरकारी सूचनांचा अवलंब करा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी आवश्यक तयारी करावी आणि अधिक माहितीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे.
माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम कधी दिली जाणार …?
“माझी लाडकी बहीण (Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra)” ही योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे आपण अशी अपेक्षा करू शकतो की, राज्य सरकार जुलै किंवा ऑगस्ट 2024 पासून माझी लाडकी बहीण योजनेचा पैसा वाटप करण्यास सुरुवात करेल. याबाबतच्या आणखी ताज्या माहिती व अपडेट्स साठी आमच्या https://rojgarjahirat.com/ या वेबसाईट वर नियमित भेट द्या.
Important Websites Links (महत्त्वाच्या वेबसाइट्स लिंक्स)
Official Website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
Online Apply (ऑनलाइन अर्ज) | येथे क्लिक करा |
Join our Whatsapp Group (आमचा व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करा.) | येथे क्लिक करा |
Join our Telegram Channel (आमचा टेलीग्राम चॅनल जॉईन करा. | येथे क्लिक करा |
Download Narishakti Doot App here (नारी शक्ति दूत ऍप डाउनलोड करा.) | येथे क्लिक करा |
Click On the Whatsapp Logo Below to Join our Whatsapp Group (खाली दिलेल्या व्हाट्सऍप लोगोवर क्लिक करुन आमचा व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करा.)
- दर महिन्याला 1500 : Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra
- e-NAM National Agriculture Market : ई -नाम
- Berojgari Bhatta Yojna Maharashtra |महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी खुशखबर! शासन देणार ५० लाख रूपयांची मदत
- सलोखा योजना महाराष्ट्र २०२४ : Salokha Yojna Maharashtra 2024
आम्ही तुम्हाला माझी लाडकी बहिणी योजना बद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि नारीशक्ती दूध ॲप द्वारे ऑनलाईन अर्ज कसा करावा हे ही सांगितले आहे. या लेखाला शेवटपर्यंत वाचा आणि या योजनेचा लाभ घेण्याची संधी सोडू नका. वरील योजने च्या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ही जाहिरात बघू शकता. इतर सर्व योजना तसेच खाजगी आणि सरकारी नोकऱ्यांचे मराठी मध्ये मोफत जॉब अलर्ट मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईट www.rojgarjahirat.com ला फॉलो करा.